भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा मालिकेत चार सामने जिंकले




माय नगर वेब टीम
गयाना -सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय महि ला संघाने साेमवारी यजमान विंडीजला पराभूत केले. यासह भारताच्या महिला संघाने टी-२० मालिकेत विजयाचा चाैकार मारला. भारताने चाैथ्या सामन्यात विंडीजवर ५ धावांनी मात केली. याच्या बळावर भारतीय संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये ४-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना गुरुवारी खेळला जाणार आहे.

यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा सलग चार सामने जिंकले आहेत. यापूर्वी भारताने २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिकेमध्ये असा पराक्रम गाजवला हाेता.आता विंडीज दाैऱ्यात भारतीय संघाने हे यश संपादन केले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ९ षटकांचा खेळवण्यात आला. यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात विंडीजसमाेर ५१ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात विंडीजला पाच गडी गमावून ४५ धावांपर्यंत मजल मारता आली.


विंडीज संघाने नाणेफेक जिंकून घरच्या मैदानावर प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. आॅफ स्पिनर मॅथ्यूजने पहिल्याच षटकात सलामीवीर शेफालीला (७) बाद केले. त्यानंतर पूजाने एकाकी झंुज देताना सर्वाधिक १० धावा काढल्या. इतर फलंदाजांनाही फार माेठी खेळी करता आली नाही. यादरम्यान मॅथ्यूजने १३ धावा देताना तीन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात विंडीजची निराशाजनक आणि संथ सुरुवात झाली. त्यामुळे टीमला ५ गड्यांच्या माेबदल्यात ४५ धावा काढता आल्या. हेन्रीने ११ आणि मॅक्लिनने १० धावांचे याेगदान दिले. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही.
प्रथमच सर्वाेत्तम स्काेअर १०, असे असूनही माेठा विजय

भारतीय संघाकडून पूजा वस्त्रकारने सर्वाेत्तम अशी खेळी केली. यातून तिने संघाकडून सर्वाधिक १० धावा काढल्या. या नीचांकी स्काेअरनंतरही संघाला विजयाची नाेंद करता आली. यातूनच यात भारताच्या नावे पहिल्या विजयाची नाेंद करण्यात आली. यापूर्वी बांगलादेश आणि श्रीलंका संघाने प्रत्येकी दाेन वेळा असे विजय मिळवले आहेत.
६०+ सामने जिंकणारा भारत ठरला पाचवा संघ
भारतीय महिला संघाचा ११२ सामन्यांत हा ६० वा विजय ठरला. भारत ६० पेक्षा अधिक सामने जिंकणारा जगातील पाचवा संघ ठरला आहे. यात इंग्लंड (९२), आॅस्ट्रेलिया (८३), न्यूझीलंड (६९) आणि विंडीज (६९) या संघांचा समावेश आहे. इतर काेणत्याही संघाला ५० विजयाचा पल्लाही गाठता आला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post