डॉ.शरद कोलते स्कूल मध्ये संविधान दिन साजरा


माय नगर वेब टीम

अहमदनगर - राज्य घटनेला धार्मिक ग्रंथा इतकेच महत्व असून त्याबद्दलची जन जागृती करणे गरजेचे आहे असे मत सचिव प्रा. विजय शिंदे यांनी केले. डॉ. शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमोल दहातोंडे, सौ दिपाली वामन शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले कि आजचा दिवस हा आपणा सर्वांसाठी फार महत्वाचा असून याची जाणीव सतत ठेवली पाहिजे. राज्यघटनेने आपल्याला जे अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत त्या दोन्हीचेही आपण पालन केले पाहिजे. खास करून घटनेच्या कलम ५१ प्रमाणे जे कर्तव्य आहेत त्यांची सतत आठवण ठेऊन त्यात उल्लेख केल्या प्रमाणे देशाचा राष्ट्र ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रपुरुष यांचा सन्मान ठेवला पाहिजे. देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, देशाच्या हिताच्या व जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

शिक्षिका यास्मिन खान यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले. त्याच प्रमाणे आजच्या दिवसाचे महत्व सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post