भारताचे संविधान हे सर्वोच्च कायदा - न्या.सुनिलजीत पाटील



माय नगर वेब टीम

अहमदनगर - 1949 साली भारताने राज्य घटनेचा स्विकार केल्यानंतर सर्व भारतीयांना हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन नागरिकांचे जीवनमान उंचवले. भारताचे संविधान हे सर्वोच्च कायदा आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या संविधानाच्याच तत्वावर काम करत असून, सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहकार्य करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधिश सुनिलजीत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात सामुहिक संविधानाचे वाचन करण्यात आले. प्राधिकरणाचे सचिव न्या.सुनिलजीत पाटील यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी उपस्थित असलेले विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य, पॅनेल सदस्य, कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांच्या मागे संविधानाचे वाचन केले. यावेळी सदस्य अ‍ॅड.शिवाजी कराळे, अ‍ॅड.विक्रम वाडेकर, पॅनेल सदस्य अ‍ॅड.प्रशांत मोरे, अ‍ॅड.धैर्यशिल वाडेकर, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.नारायण गणबोटे, पल्लवी गंडवार, अ‍ॅड. करपे, अ‍ॅड.शुक्रे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक प्रकाश ताकसाळे, नरेंद्र देशमुख, योगेश हळगांवकर आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post