माय नगर वेब टीम
अहमदनगर - दरवर्षीप्रमाणे श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (प्राथमिक), सावेडी या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कथाकथन या विषयावर बोलू काही, प्रश्नमंजुषा, इंग्रजी स्पेलिंग सांगणे, पाठांतर, हस्ताक्षर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते स्नेह संमेलनात करण्यात येणार आहे. क्रीडा प्रात्यक्षिके, विविध गुणदर्शन व विद्यार्थी सहभोजन अशा विविध रंगछटांनी परिपूर्ण असा कार्यक्रम नाताळापूर्वी संपन्न होईल, असे मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांनी सांगितले.
पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध वेशभूषा स्पर्धेत 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या बालचमूंनी विविध वेशभूषेच्या माध्यमातून समता, बंधूता, निसर्गाचे रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, रहदारीचे नियम असे संदेश दिले. विविध वेषभूषा स्पर्धा यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका धनश्री गुंफेकर, नीता भाळवणकर, प्रियंका कुलकर्णी, शिक्षक विश्वास शेरकर व गणेश पारधे यांनी विशेष परिश्रम घेतले .
वेशभूषा स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त अ गट ः प्रथम - आकृती आसनीकर, द्वितीय - भार्गवी गोसावी व पद्मजा जोशी, तृतीय - आराध्या पतंगे. ब गट ः प्रथम - जान्हवी केळकर, द्वितीय- स्नेहल गेंजे, तृतीय - अर्णव चिकटे. क गट ः प्रथम - अरुण तरवडे, द्वितीय - साई निमसे, तृतीय - सिद्धी आठरे, ड गट ः प्रथम - मानव कन्हेरकर, द्वितीय - वैष्णवी रोहकले व अदिती थोरात, तृतीय - जान्हवी जगताप.
Post a Comment