भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले तर काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक सुरु असून तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले आमदार आणि अपक्ष आमदार असे एकूण 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच आम्ही कोणतीही मेगा भरती करणार नाही, राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या आमदारांना मेरिटवरच पक्षात प्रवेश दिला जाईल, अस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे पाटील म्हणाले. मग शिवसेनेसोबत कसं जाणार? या प्रश्नावर दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर त्यांनी दिले.
Post a Comment