नगरच्या नाट्य भूमीने मुंबई, पुण्याच्या तोडीचे कलाकार घडवले
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगरच्या नाट्य स्पर्धेने महाराष्ट्रला कलाकार दिले आहेत. ते आज या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. नगरच्या नाट्य भूमीतील कलाकारांना आर्थिक पाठबळ कमी असताना देखील पुणे, मुंबईच्या कलाकारांना तोडीस-तोड कलाकार घडवले आहेत. चागले लेखक, समीक्षक दिले आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक नामदेव देसाई यांनी केले.
शनिवारी नगरला 59 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सदस्य सतिश शिंगटे, नाट्य दिग्दर्शक संजय पाटील, नाट्य कलावंत क्षितिज झावरे उपस्थित होते.
देसाईे पुढे म्हणाले, परिक्षेकचे काम मोठे धाडसाचे आहे.परिक्षकांकडून ते योग्य प्रकारे होईल. नगरच्या ग्रामीण भागातील तंत्रज्ञान पोहचले असले तरी त्याच्या वापरासाठी आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही. त्यादृष्टीने ग्रामीण कलाकारांना आर्थिक साहाय्य केले तर चांगले कलाकार घडतील. त्यामुळे ग्रामीण भागातील नाट्य कला उज्जवल होईल, नाट्य सभागृहासाठी निधी मिळत नसल्याने कलाकारांना तलीमसाठी सभागृह उपलब्ध होत नाहीत, कलाकारांना पुढे येण्यासाठी सभागृहना निधी मिळणे आवश्यक आहे.
Post a Comment