शिवसेनेचे खासदार आता विरोधी बाकावर बसणार, शिवसेना एनडीएतून बाहेर गेल्याची भाजपकडून अधिकृत घोषणा
माय नगर वेब टीम
मुंबई - मुंख्यमंत्री पदामुळे फुट पडलेल्या भाजप-शिवसेनेच्या संसाराचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, "शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वादंग उठले आणि याचाच फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेऊन सेनेला आपल्या जवळ आणले. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर अखेर आज दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत शिवसेना न आल्याने भाजपने अधिकृतरित्या शिवसेना एनडीएतून बाहेर गेल्याचे जाहीर केले.
Post a Comment