अजित पवारांचे ‘ते’ विधान लोकांचे दिशाभूल करणारे: शरद पवार
माय नगर वेब टीम
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असतांना या दरम्यान अजित पवार यांनी पुन्हा ट्विट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अजित यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी ट्विट करत नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे आभार मानले आहेत. तर आता नवे ट्विट करत म्हटले आहे कि, मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असून शरद पवार आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली असून पुढील पाच वर्ष आम्ही स्थिर सरकार केहलविणार आहोत. तसेच राज्यातील जनतेसाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत.’
तर यावर शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे, ते म्हणतात कि, भाजपशी आम्ही युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आम्ही शिवसेना काँग्रेस यांच्याबरोबर एकमताने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचे म्हणणे चुकीचे असून लोकांमध्ये संभ्रम आणि खोटी समज निर्माण करणारे व दिशाभूल करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्याला काल सकाळ नंतर वेगळेच वळण मिळाले. आज झालेल्या सुनावणीनंतर उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी असून अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे.
Post a Comment