How is Josh? जय महाराष्ट्र! संजय राऊतांचे ट्विट
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळी ट्विट करून नेहमीच प्रकाशझोतात राहिलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज सकाळच्या ट्विटनेही लक्ष वेधून घेतले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर आज शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे.
यामध्ये ते म्हणतात, ‘हाउज द जोश…’ जय महाराष्ट्र
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दररोज पत्रकार परिषद तसेच नवनवे ट्विटसच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमे गाजवली. आज सरकारस्थापनेच्या मुहूर्तावरदेखील त्यांनी सकाळीच एक ट्विट केल्यानंतर सर्वांनीच हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे ट्विट केले असल्याचे बोलले जात आहे. आजच्या सामानाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करेल असे म्हटले आहे.
Post a Comment