राज्यापालांकडून शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा



माय नगर वेब टीम
मुंबई/अहमदनगर – अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार, खरिपासाठी शेतकर्‍यांना प्रति हेक्टर आठ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर फळबागांसह बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर दिले जाणार आहेत. खरीप आणि बारामाही पीक अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीसाठी कमाल दोन हेक्टरपर्यंत भरपाई दिली जाईल. या मदतीसह नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

महाविद्यालये आणि शाळांमध्ये द्यावे लागणारी शुल्क माफ केले जाईल. ही मदत तातडीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रशासनाला आदेशही देण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. दरम्यान, राज्यपालांच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीच्या घोषणेनंतर देण्यात येणारी ही मदत सरसकट शेतकर्‍यांना मिळणार की या मदतीतून पीक विमा असणार्‍या शेतकर्‍यांना वगळून मदत देण्यात येणार याबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

राज्यपालांच्या घोषणेनंतर या वरिष्ठ अधिकार्‍यांना केवळ मदतीची घोषणा झाल्याची माहिती मिळाली. काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दाव्यानुसार सोमवारी याबाबत सविस्तर अध्यादेश निघणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीमध्ये कोणत्या शेतकर्‍यांचा समावेश राहिल, हे स्पष्ट होणार आहे. नगर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारीच कृषी आयुक्तांना जिल्ह्यातील 1 हजार 583 गावांतील 6 लाख 36 हजार 146 शेतकर्‍यांचे 4 लाख 54 हजार 12 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीचा हा आकडा 475 कोटी रुपयांचा असल्याचा अहवाल पाठविला आहे. आता हा अहवाल कृषी आयुक्तांकडून राज्याचे मुख्य सचिव आणि त्यानंतर राज्यपालांसमोर जाणार आहे.

राज्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकर्‍यांसाठी शनिवारी राज्यपालांकडून दिलासादायक बातमी देण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत अवकाळी पावसामुळे ज्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल कार्यभार सांभाळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकर्‍यांपर्यंत जाहीर करण्यात आलेली मदत पोहोचवली जाणार आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी केली होती.

राज्यपालांनी निर्णयाचा फेरविचार करावा – आ. थोरात
गेल्या अनेक दिवसांपून सरकार मदत करेल या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. त्यात मशागतीचा खर्च ही निघणार नाही. म्हणूनच राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या मदतीत भरीव वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा गोषवारा काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्या आकडेवारीचा आधार घेतला तर राज्याच्या सर्व विभागातील जवळपास 325 तालुक्यांतील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 8 हजार रूपये प्रति हेक्टर ही मदत अत्यंत तोकडी आहे. पावसामुळे वाया गेलेल्या फळबागांना मदत म्हणून जाहीर केली प्रति हेक्टरी 18 हजार रूपये ही मदत अत्यंत अपुरी आहे. मच्छीमार बांधवांना राज्यपालांनी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करून शेतक-यांना जाहीर केलेल्या मदतीत भरीव वाढ करावी ही आमची मागणी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता शेतकर्‍यांना सुलतानी जाच- आ.धनंजय मुंडे
राज्यपालांनी ओल्या दुष्काळावर घोषित केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून यातून पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकारला शेतकर्‍यांचे दुःख या जन्मात तरी कळणार आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करणे अपेक्षित होते. शेतकर्‍यांच्या मुलांना केवळ परीक्षा फी नव्हे तर पूर्ण शैक्षणिक खर्च माफ करायला हवे होते. तसेच कोणतीही अट किंवा निकष विरहित मदत देणे अपेक्षित होते असेही आ. मुंडे यांनी म्हटले आहे. काळजीवाहू सरकारने व विरोधीपक्षांनी केलेल्या मागणीनुसार क

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post