माय नगर वेब टीम
अहमदनगर – इथोपिया देशातील विविध खात्याच्या प्रशासकीय अधिकारी शिष्ट मंडळाने दि.१५ नोव्हेंबर २०१९ रोजी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. या शिष्ट मंडळात जलसंधारण, महिला, बालविकास, समाजकल्याण, दुग्धविकास, कृषी विभागातील त्या देशात काम करणारया वरिष्ठ आधीकारायांचा समावेश होता.
हिवरे बाजार मध्ये गेली ३० वर्षे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सरकारी योजनांचा व्यवस्थित लाभ घेतल्याने या गावात सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उच्च दर्ज्याच्या पहायला मिळाल्या.या भेटीच्या आधारे त्या देशातील भौगोलिक परिस्थितीनुरूप शासकीय योजनांचा व्यवस्थित रीत्या उपयोग करून तेथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.या भेटीदरम्यान श्री.पवार यांनी शिष्ट मंडळास हिवरे बाजारमधील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
Post a Comment