माय नगर वेब टीम
मुंबई- बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला पाठींबा देण्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी बारामतीमधील आपल्या कार्यकर्त्यांसमोर भाजपला पाठींबा का दिला याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिणीला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली.
कार्यकर्त्यांना सांगताना अजित पवार म्हणाले की, "पक्षातील जेष्ठ नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपसोबत जायचे, असे काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या. पण, मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय", असे अजित पवारांनी सांगितले. तसेच, गुप्त मतदार झाले तर आपण जिंकणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. "मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण वेळ आल्यावर सर्व बोलणार", असा इशारा अजित पवारांनी दिला.
Post a Comment