महिलांना सन्मान मिळवून देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले - सुरेखा कदम


माय नगर वेब टीम
अहमदनगर - बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत, त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. त्यामुळे आज सर्वस्तरामध्ये शिवसेना काम करत आहे. सर्वसामान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृत करुन शिवसैनिक तयार केला आहे आणि तो कधी मोडणार नाही, झुकणारही नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे होते. त्यांनीच सर्वसामान्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. जनतेसाठी लढणारा नेता म्हणून त्यांचे ख्याती होती. महिलांना सन्मान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथे माजी महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दिपाली आढाव, रजनी कोथिंबीरे, मिनल थोरात, विद्या मुनोत, भारत कानडे, हिराबाई दहिहंडे, नंदा शितोळे, सुमन खामकर, सुनिता होनकर, मीना खामकर, मंदा खामकर, आशा नगरे आदि उपस्थित होते.

सुरेखा कदम म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी मोठा लढा उभारुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. महिलांचा सन्मान करा, त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांचा शिवसेना स्टाईलने बंदोबस्त करा, असेच आदेश होते. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम महिला सेनेने केले. महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा मुकाबला करा, अभिमानाने उभे राहा, महिला आबला नसून सबला आहे असा आत्मविश्‍वास बाळासाहेबांनी महिलांमध्ये निर्माण केला. अशी महान व्यक्ती महिलांची प्रेरणास्थान राहील, असेही त्या म्हणाले. शेवटी दिपाली आढाव यांनी सर्वांचे आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post