खळबळजनक! उद्योजकाचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण


माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, लॉन्स, हॉटेल मालकाचे आज सकाळीच्या सुमारास कोठला परिसरातून पिस्तुलाच्या धाकाने सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.
आज सकाळी उद्योजक  नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडले. ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घातले. त्यानंतर ती गाडी भरधाव वेगात निघून गेली. हा प्रकार शहरातील काही जणांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. अपहरणाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post