शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा प्रशिक्षकपदी सतीश गायकवाड यांची नियुक्ती
माय नगर वेब टीम
अहमदनगर- क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे. महाराष्ट्र शासन. यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय स्केटींग रोलर हॉकी राज्यस्तर स्पर्धा या दिनांक २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान व शालेय स्पीड स्केटिंग स्पर्धा या दिनांक ०३ डिसें. ते ०६ डिसें. दरम्यान याक पब्लिक स्कूल खोपोली ता खालापूर जि रायगड येथे होणार आहेत.
सदर राज्यस्तर स्पर्धेतून राष्ट्रीय स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत बेळगाव, कर्नाटक येथे होणार आहे तत्पूर्वी राष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबिर दि. २९नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, मार्गदर्शक म्हणून नियुक्तीचे पत्र क्रीडा कार्यालयाच्या वतीने सतीश दादासाहेब गायकवाड यांना देण्यात आले. गायकवाड हे स्केटिंग खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असून आतापर्यंत स्केटिंग खेळात त्यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाखाली अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत. तसेच ते कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, भुषण नगर, केडगाव येथे शिक्षक या पदावर कार्यरत असुन अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनचे सहसचिव, अहमदनगर फिल्ड आर्चरी संघटनेचे अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा टेनिस-व्हाॅलीबाॅल संघटनेचे सचिव देखील आहेत. टिम स्पिड स्केटिंग अॅकेडमी मार्फत महानगर पालिका विभागीय कार्यालय, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे स्केटिंग खेळाचे प्रशिक्षण वर्ग ही चालतात. सदर नियुक्ती बाबत अहमदनगर जिल्हा संघटनेचे सचिव असीफ बा. शेख व पदाधिकार्यानी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment