यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा आजही प्रेरणादायी -प्रा.माणिक विधाते
माय नगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सारंग पंधाडे, सरचिटणीस मयुर भापकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, सागर सोबळे, अमित ताकपेरे, स्वप्निल भोरे, अमोल जाधव, देवेंद्र थोरात, विकास मोरे, सुरज घोडके, किरण दरोडे, प्रविण मतकर, जयदिप नलगे, शुभम शिपळकर, बाबूराव भिंगारदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यांचा वैचारिक वारसा आजही प्रेरणादायी व दिशादर्शक असून, हा वारसा खा. शरद पवार चालवित असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासासाठी राष्ट्रवादी सदैव कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, त्यांना भरीव मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Post a Comment