महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर आज निर्णय
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करून घेण्यात आली. या याचिकेवर परवा आणि काल दोन दिवस सुनावणी झाली. सत्तास्थापनेसंदर्भात राज्यपालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. ती कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून, कोर्ट आज 26 नोव्हेंबर रोजी निर्णय सुनावणार आहे. आज साडे दहा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात येणार आहे.
रविवारी न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भाजपला सत्तास्थापनेच्या दाव्याची पत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पुढील सुनावणी झाली. पहाटे 5.17 वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्याची आणि 8 वाजता शपथ घेण्याची इतकी घाई का?, असा सवाल शिवसेनेच्यावतीनं अॅड. कपिल सिब्बल यांनी केला.
सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवून तातडीने बहुमत चाचणी घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यास भाजपचे वकील मुकुल रोहोतगी यांनी आक्षेप घेतला. याचिकेत राष्ट्रपती राजवट हटविण्याच्या निर्णयाला आव्हानच देण्यात आलेले नाही, याकडे रोहोतगी यांनी लक्ष वेधले. तसेच अजित पवारांनी सादर केलेले 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र नेता निवडीसाठी आहे.
पाठिंब्यासाठी नाही, असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या वकिलांनी यावर सुमारे दीड तास युक्तिवाद केला. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर, उद्या (26 नोव्हेंबर) सुकाळी साडे दहा वाजता आदेश देणार असल्याचं जाहीर केलं
Post a Comment