माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले.
यावेळी साहेबान जहागीरदार, नगरसेवक समद खान, सय्यद शफी बाबा, उबेद शेख, नईम सरदार, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, अंजूम इनामदार, वहाब सय्यद, तन्वीर भाई, आमीर सय्यद, आबिद दुल्हेखान, नासिर खान, मुसद्दीक मेमन, वाहिद शेख, भैय्या बॉक्सर, फैसिम शेख, आसिम शेख, अल्तमाश जरीवाला, मोहसीन शेख, फैद शेख आदींसह मुस्लिम समाजबांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय आहे प्रकरण
हैदराबाद शहराच्या बाहेरील शमशादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला. ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती.
डॉ. रेड्डी यांच्यावर सामुहीक बलात्कार केल्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.
सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.
Post a Comment