माय नगर वेब टीम
अहमदनगर - चांगल्या प्रमाणात झालेल्या पावसाने दुष्काळाचे सावट ओसरले असून, दिवाळी निमित्त बाजरपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी केली होती. सनई-चौघड्यांच्या सुरात ग्राहकांचे शोरुममध्ये स्वागत करण्यात आले. दिवसभरात तब्बल 27 कारचे वितरण करण्यात आले.
गाडीची विधीवत पुजा करुन, नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांच्या हस्ते कारचे वितरण करण्यात आले. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दीपक जोशी, प्रविण जोशी, अरणगाव येथील अरुण शिंदे, पोपट शिंदे, गणपत शिंदे, रविंद्र थोरात, चित्रा माळगे, कविता बारकसे, दिपिका साधवाणी, नितीन कुलदिप, अविनाश लाळगे आदींसह शोरुमचे कर्मचारी वर्ग व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देऊन कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा कळ अधिक आहे. तसेच सुसज्ज शोरुम, वर्कशॉपच्या माध्यमातून तत्पर सेवा, कुशल कामगार वर्ग यामुळे ग्राहक टोयोटाला पसंती देत असल्याची माहिती शोरुमचे अनिश आहुजा यांनी दिली. तसेच दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक सवलत देण्यात आली होती. या व्यतिरिक्त शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीवर आकर्षक सवलत उपलब्ध करुन देण्यात आली असून, ग्राहकांना शोरुमला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment