जिल्हा प्रशासनाचे आदेश
माय नगर वेब टीम
अहमदनगर - ऑक्टोबर 2019 मध्ये अवेळी पाऊस व अतिवृष्टीने ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कृषी विभाग आणि सर्व तहसीलदार यांना यासाठी पथके स्थापन करुन पंचनामे करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हयात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने तातडीने पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीने ३३ टक्के किंवा त्यीपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी यासंदर्भात संबंधित तलाठी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या शेतक-यांनी शेतीपिकांचा पीकविमा उतरवला आहे. अशा शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांनी संबंधित विमा कंपनीला कळविणे आवश्यक असून त्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे तसेच संबंधित तहसीलदार यांनी शेतीपिका व्यतिरिक्त झालेल्या इतर नुकसानीबाबत त्यांच्या स्तरावरुन तात्काळ सबंधितांना मदत अदा करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकरीवर्गातून होत होती


Post a Comment