पाडव्याच्या मुहूर्तावर इलाक्षी ह्युंदाई शोरुममधून 78 चारचाकी वाहनांची विक्री



माय नगर वेब टीम 
अहमदनगर - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये कार खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सनई, चौघड्यांच्या सूरात तर मंगलमय उत्साहपुर्ण वातावरणात ग्राहकांना नवीन गाडीचे वितरण करण्यात आले.
सकाळपासूनच ग्राहक नवीन वाहन घरी घेऊन जाण्यासाठी कुटुंबीय व मित्रमंडळी सोबत शोरुममध्ये दाखल झाले होते. या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 78 चारचाकी वाहनांची विक्री करण्यात आली. ग्राहकांचे गुलाबपुष्पाने केलेले स्वागत, कर्मचार्‍यांच्या विनम्र सेवेने ग्राहक भारावले. शोरुमच्या वतीने ग्राहकांना विशेष सवलती देण्यात आल्या होत्या. सुरक्षितता व आकर्षक लूक असणार्‍या ह्युंदाईचे कार्सना ग्राहकांची चांगली मागणी आहे. तर ग्राहकांना वाहन विक्री पश्‍चात सर्वोत्तम सेवा देण्यास शोरुम कटिबध्द असून, ग्राहकांचे विश्‍वास संपादन केले असल्याचे शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी सांगितले.
ह्युंदाईच्या स्मार्ट डिल्स ऑन व्हील्स या योजनेला ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले. प्रथमच वाहन खरेदी करणार्‍या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तर ग्राहकांच्या सोयीसाठी शोरुमच्या वतीने सावेडी भागात सर्व्हिस कॅम्प, लष्करी जवानांसाठी ग्राहक मेळावा असे विविध उपक्रम शोरुमच्या वतीने राबविण्यात येत असतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post