मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केला ट्रॅक्टर ट्रॉलीचा पूल
माय नगर वेब टीम
बारामती - बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मतदान केंद्राबाहेर प्रचंड चिखल झाला. या चिखलातून चालणेही शक्य नव्हते. यामुळे मतदार मतदानासाठी कसे येतील असा प्रश्न मतदान अधिकाऱ्यांना पडला होता. मात्र ग्रामस्थांनी शक्कल लढवत या अडचणीवर मात केली आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ग्रामस्थांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकमेकांना जोडून त्यांचा पूल तयार करण्यात आला. येथील ग्रामस्थ देखील उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत.

Post a Comment