पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले
माय नगर वेब टीम
कर्जत - कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे मतदानाच्या एक दिवस आधी दोघांना मतदारांना पैशाचे वाटप करताना रंगेहाथ पकडले. भरारी पथक आणि कर्जत पोलिसांनी रविवारी रात्री 11 वाजता ही कारवाई केली.किशन जाधव असे एकाचे नाव असून तो पारवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे बरीच रोख रक्कम आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाईल सापडले. दोघेही रोहित पवार यांच्या कार्यालयात कामाला असून त्यांच्याच ऑफिसमधून आलो असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व बाहेरील राजकीय व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये, या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कलम 171 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment