संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 55% आणि हरियाणात 62% मतदान; निकाल 24 ऑक्टोबरला
माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघप्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदान केले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर कर्नाळ येथे सायकलवरून मतदान करण्यासाठी पोहोचले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 55% आणि हरियाणात 62% मतदान झाले.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केले होते. या पक्षांतराचा त्यांना फायदा होणार की फटका बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी कळणार आहे.

Post a Comment