दिल्लीतील द्वारका येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते रावण दहन
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयादशमी निमित्त द्वारकाच्या सेक्टर १० मध्ये रावण दहन केले. तत्पूर्वी मोदींनी दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस लाइनमध्ये प्रवास केला. जय श्रीराम! आपण सर्वांना विजयादशमीच्या अनेक शुभेच्छा. राम-कृष्णने सामुहिकतेच्या शक्तीचा परिचय करून दिला. आपल्याला हाच संकल्प पूर्ण करायचा आहे. उत्सव हा भारताच्या सामाजिक जीवनाचा घटक असून यानेच लोक एकत्रित येतात असेही मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.


Post a Comment