सिरियात नवव्या दिवशी तुर्कीने सैन्य मोहीम थांबवली, ५ दिवस शस्त्रसंधी



माय नगर वेब टीम
अंकारा - तुर्कस्थानने सिरियातील कुर्द भागात नवव्या दिवशी हल्ले थांबवले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी याबाबत घोषणा केली. पेन्स यांनी सांगितले की, कुर्द नेतृत्वातील सैन्य मागे हटावे यासाठी उत्तर सिरियातील आपली सैन्य मोहीम थांबवण्यास तुर्कस्थानने होकार दिला आहे. अंकारामध्ये पेन्स आणि तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेसेप तैयेप एर्दोगन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. यानंतर तुर्कस्थानने सिरियातील आपल्या सर्व सैन्य मोहिमा पुढील पाच दिवसांसाठी थांबवल्या आहेत. या काळात कुर्द सुरक्षा दलाला सुरक्षित परत जाण्यास अमेरिकी सैन्य मदत करेल. ज्या भागात तुर्कस्तानला सुरक्षित भाग बनवायचा आहे त्या भागातून कुर्द सैन्य मागे घेतले जात आहे. युद्धविरामावर तुर्कस्तानला राजी करण्यासाठी माइक पेन्स अंकारा येथे अाले होते. ते सुमारे ९ तास थांबले होते. ८० मिनिटे त्यांच्यात आणि एर्दोगन यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांनी दिलेल्या सल्ल्याकडे एर्दोगन यांनी दुर्लक्ष करत त्यांचे पत्र कचराकुंडीत फेकल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post