...निकाल लागताच आमदार जगताप रस्ताप्रश्नी आक्रमक





माय नगर वेब टीम
अहमदनगर - रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या याबाबत नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी दिल्लीगेट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा
हक्कभंग दाखल करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 दिल्लीगेट परिसरातील सिद्धीबागेजवळ पावसामुळे रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. वाहनचालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. हे खड्डे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडवून देतात. काही बेभान वाहनचालकांमुळे खड्ड्यांतील पाणी पादचान्यांच्या अंगावर उडते. अशा घटनांमुळे वाहनचालक व पादचान्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडून येतात.

 याबाबत मनपा व बांधकाम विभाग या यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेतात. या रस्त्याने जाणान्या येणान्या नागरिकांचा संताप अनावर होतो. तसेच या रस्त्याबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली व रस्त्याचे काम करण्याच्यासूचना दिल्या. मात्र अद्यापपर्यंत बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. या रस्त्याबाबत शासनाचा निधी असूनही काम सुरू करण्यात येत नाही. याबाबत प्रशासनाच्या धोरणाविषयी शंका आहे, असा आरोप आमदार जगताप यांनी निवेदनात केला आहे.

 या रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू न केल्यास लोकप्रतिनिधींना खोटी माहिती व आश्वासन दिल्याप्रकरणी आगामी अधिवेशनात हक्कभंग दाखल करू, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post