हिवरे बाजारच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास करणार - आ. निलेश लंके


माय नगर वेब टीम
अहमदनगर  - हिवरे बाजारच्या धर्तीवर पारनेर-नगर मतदारसंघाचा विकास करणार आहे. मतदारसंघात हिवरे बाजार व राळेगणसिद्धी हि दोन आदर्श गावे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवादगार नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी काढले.

आज दि.२५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके - यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला येऊन पोपटराव पवार यांची भेट घेतली. विविध विकास कामांबाबत चर्चा करून भविष्यकाळात हिवरे बाजारच्या धर्तीवर मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी पवार साहेब व हिवरे बाजारच्या आशिर्वादाची गरज आहे.

भविष्य काळात पाणी, शिक्षण व ग्रामविकासात भरीव असे काम करणार असून त्यासाठी पोपटराव पवार यांना गुरुस्थानी मानून काम करण्याचा मी सदैव प्रयत्न करील तसेच माझ्या मतदारसंघात हिवरे बाजार व राळेगणसिद्धी हि दोन आदर्श गावे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवादगार आमदार लंके यांनी काढले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post