बांधकाम व्यवसाय वृद्धीसाठी तांत्रिक कार्यशाळा उपयुक्त ठरतात


एसाचे अध्यक्ष सलिम शेख यांचे मत ; नगरमध्ये बांधकाम व्यावसायिकांसाठी कार्यशाळा

माय नगर वेब टीम

अहमदनगर- बांधकाम व्यवसायात वृद्धीसाठी तांत्रिक कार्यशाळा या व्यावसायिक, आर्किटेक, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स यांच्या साठी अतिशय उपयुक्त ठरत असतात. या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान अवगत होते असे मत आर्किटेक, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असो. अ.नगरचे अध्यक्ष सलीम शेख यांनी व्यक्त केले.

पीडीलाईट कंपनीचे रौफ टाईल व स्टोन फिक्सिंग सोल्युशन आणि दर्शना ट्रेडिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आर्किटेक, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असो. अ.नगर, इंटेरिअर डिझायनर असोसिएशनच्या सदस्यांसाठी तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर यांच्यासाठी रौफ उत्पादनांची माहिती देण्यासाठी नगर मध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते.

पुढे बोलताना सलिम शेख यांनी संस्था सभासदांसाठी विविध तांत्रिक सेमिनार, प्लॉट व्हिजिट, शॉप व्हिजिट, सामाजिक उपक्रम राबवित असून या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान अवगत होते. त्याचा व्यवसायात वृद्धीसाठी मोठा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

रौफ कंपनीचे मार्केटिंग अधिकारी शैबल तिवारी यांनी कंपनीची माहिती दिली. सुरेश पालपारथी यांनी तसेच सुरज मारे यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. दर्शना ट्रेडिंग कंपनीचे जितेंद्र मुनोत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला आर्किटेक, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असो.चे अध्यक्ष सलिम शेख, सचिव आदिनाथ दहिफळे, उपाध्यक्ष विजय पादिर, इंटेरिअर डिझायनर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित लोटके, उपाध्यक्ष अंकुर सुपेकर, सचिव सागर कंदूर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर असो.चे अध्यक्ष अवतार हिरा, चंद्रकांत तागड, कविता पहुजा, शाम गुलाटी, धनेश मुनोत, वैभव देशमुख, तसेच आर्किटेक अरुण गावडे, अन्वर शेख, प्रदीप तांदळे, एकनाथ जोशी, कन्हैय्या गांधी यांच्यासह सभासद उपस्थित होते. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र मुनोत यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post