वसुबारसेनिमित्त जिल्हाधिकार्यांच्या हस्ते गाय-वासराचे पूजन
माय नगर वेब टीम
अहमदनगर- प्रकाशाचा, आनंदाचा सण म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. सलग तीन दिवस साजरा केला जाणार्या या दीपावली सणाचा प्रारंभ वसूबारसेने केला जातो. या वसुबारसेच्या मुहुर्तावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर निवास या निवासस्थानी असलेल्या गाय-वासराची साग्रसंगीत पूजा केली.
यावेळी वनविभागाचे अधिकारी आदर्श रेड्डी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, वन विभागाचे अधिकारी रेड्डी यांच्या सौभाग्यवती गीता रेड्डी, सौ. सीमा नवलकर आदी उपस्थित होते.
विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांची सांगड कृषी संस्कृतीशी घालण्यात आली आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाची सुरुवात देखील वसुबारसेने होते. काल दि. 25 रोजी जिल्हाभरातील घराघरात गायीचे पुजन करुन नागरिकांनी दीपावली सणाचे स्वागत केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांभाळण्यासाठी नगर निवासस्थानी गाई आणलेल्या आहेत. त्यांनी या गाय-वासराचे औक्षण करीत पूजन केले.

Post a Comment