शहराच्या आमदारकीसाठी १७ जणांचे उमेदवारी अर्ज; आ.जगताप, राठोड, छिंदम यांनी भरले अर्ज


माय नगर वेेेब टीम

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर शहर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि.४) शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत २१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये अनिल राठोड (शिवसेना), आ.संग्राम जगताप (राष्ट्रवादी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), किरण काळे (वंचित बहुजन आघाडी), श्रीपाद छिंदम (बहुजन समाज पक्ष), आसिफ सुलतान (एमआयएम), बहिरनाथ वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), प्रतिक बारसे (अपक्ष), सुरेश गायकवाड (अपक्ष), श्रीराम येंडे (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष), संदीप सकट (अपक्ष), संजय कांबळे (अपक्ष) यांच्यासह अन्य अशा 21 जणांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधित ७० जणांनी ९७ उमेदवारी अर्ज नेले होते. त्यापैकी २१ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (दि.५) होणार असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत सोमवारी (दि.७) आहे.

अर्ज माघारीनंतरच शहरात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर उमेदवारांच्या प्रचाराला अधिक वेग येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप व शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्यातच ही लढत रंगणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post