दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको ; 600 गावांनी केला ठराव
माय नगर वेब टीम
मुंबई – विधानसभा निवडणुकीमध्ये दारूचा वापर होऊ नये यासाठी राज्यातील 600 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला आहे. यात गडचिरोली 287 गावांचा समावेश आहे. दारू पिणारा नको आणि पाजणाराही नको, असा ठराव अशी भूमिका या गावांनी घेतली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मुक्तिपथ अभियान राबवण्यात येत आहे. जिह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 600 गावांनी दारुबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 120 ग्रामपंचायतींनी आताची विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गावकर्यांनी केलेल्या ठरावांमध्ये तीन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत.
यात राजकीय पक्षांनी उमेदवार देताना तो दारू पिणारा नसावा, उमेदवारांनी मतांसाठी दारू वाटू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये या मुद्यांचा समावेश आहे. हे ठराव सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांकडे पाठविले असल्याचे डॉ. बंग यांनी सांगितले.
Post a Comment