माय नगर वेब टीम
अहमदनगर – मंजुर शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे अनुदान बॅंक खात्यात वर्ग करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारा कर्जत येथील कृषी सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केला आहे.
आरोपी जयसिंग सर्जेराव साळुंके (वय-50,रा. शिव पार्वती मंगल कार्यालय, कुळधरण,कर्जत) यास ताब्यात घेतले आहे. कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथील गट नं. 326 मधील मंजूर शेततळ्याचे अस्तरीकरणाचे अनुदान बॅंक खात्यात वर्ग करण्यासाठी साळुंके यांनी 10 हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 5 हजार मागितले होते.
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दीपक करांडे यांच्यासह शाम पवरे, तनवीर शेख, प्रशांत जाधव, सतीश जोशी, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.

Post a Comment