माय नगर वेब टीम
अहमदनगर - रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेले आसमंत तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या दीपोत्सव-2019 चे. एमआयडीसी येथील स्नेहालयात लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने तर निरंजन सेवाभावी संस्था, बाल कल्याण समिती, इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर व्हिनस, स्नेहालय परिवाराच्या सहकार्याने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्नेहालयासह बालभवन व विविध संस्थेतील 1200 विद्यार्थी सहभागी झाले.
दीपोत्सवाचे उद्घाटन मुंबई डबेवाला असो.चे अध्यक्ष सुभाष तळेकर व माजी प्रांतपाल राज मूछाल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस.एस. दीपक, शरद मुनोत, गायिका अंजली व नंदिनी गायकवाड, क्लबचे अध्यक्ष आनंद बोरा, रिजन चेअरमन हरजितसिंह वधवा, झोन चेअरमन दिलीप कुलकर्णी, निरंजन सेवाभावी संस्थेचे अतुल डागा, इनर व्हील क्लब ऑफ विनसच्या अध्यक्षा प्राजक्ता डागा, प्रकल्प प्रमुख अरविंद पारगावकर, सुनील छाजेड, शांता ठुबे, सचिव सुमित लोढा, खजिनदार सतीश बजाज, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्सचे संचालक (केंद्र सरकार) सीए सौरभ देशमुख, पुणे लायन्सचे परमानंद शर्मा, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, सचिन गुगळे, श्याम असावा, अंजली कुलकर्णी, श्री वैजनाथ, बाल कल्याण समितीचे हनिफ शेख, नितीन मुनोत, योगेश भंडारी, मंगेश सिकची, शुभांगी धामणे आदींसह व्यापारी, उद्योजक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष आनंद बोरा यांनी क्लबच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तर वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जात असल्याचे सांगत, दीपोत्सवाचे हे अकरावे वर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत हरजितसिंह वधवा यांनी केले. कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले मुंबईचे डबेवाले फेम सुभाष तळेकर यांनी लंडन येथे प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाला गेले असता तेथील अनुभव व विनोदी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना हसविले. एका दिवसात कोणतीही चुक न करता 2 लाख डबे पोहचविणे व परत आनण्याचे गुपित उलगडले तर जीवनात मोठे कार्य करण्यासाठी वेळेचे नियोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या दीपोत्सवात अंजली व नंदिनी गायकवाड या बहिणींचा सुमधूर गीतांची संगीत मैफल रंगली होती. गणेश वंदनेने सुरु झालेल्या या मैफलमध्ये एकापेक्षा एक मराठी गीतांचा नजराणा त्यांनी सादर केला. तसेच स्नेहालयातील लहान मुलींनी देखील त्यांना साथ देत भक्तीगीते सादर केली. संगीत मैफल रंगात आल्यावर बालगोपालांसह उपस्थित पाहुण्यांनी मराठी व हिंदी गीतांवर ठेका धरला होता. दुपारी 3 वाजल्या पासून सुरु झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात चाईल्ड लाईन, बालभवनच्या विद्यार्थ्यांसह, श्रीगोंदा, उत्कर्ष बालभवन, युवान, स्नेहालय रिहाब सेंटर, शासकीय बालगृह, बाबावडी, अनाम प्रेम, सावली, यतीमखाना, गाडगे महाराज, संस्थेचे सुमारे 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी भाऊबीज साजरी करण्यात आली. मुलींनी उपस्थित भावांना ओवाळणी केली. त्यानंतर मुलांना लायन किंग चित्रपट दाखविण्यात आला. संध्याकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या धमालमय कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना खाऊ, चॉकलेट, आईस्क्रिमसह भोजनाची मेजवाणी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोरा व डॉ.अमोल बागुल यांनी केले. आभार धनंजय भंडारे यांनी मानले. यावेळी योगेश चंगेडे, विपूल शाह, नीलम परदेशी, अभिजीत लुणिया, सुधीर लांडगे, कमलेश भंडारी, किरण शिंगी, राजबीरसिंह संधू आदी उपस्थित होते.
Post a Comment