राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान
माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात मतदानाची वेळ संपली आहे. राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानामध्ये 10 टक्क्याहून अधिक भर पडली.

Post a Comment