मतदानाला गालबोट, कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी




माय नगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे ही घटना आहे. भालेराव वणवे आणि हर्षवर्धन कुंदे हे भाजपचे कार्यकर्ते मतदानाला जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांवर चाकूने हल्ला केला. भाजपच्या एक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि दुसऱ्याच्या हातावर वार केल्याने भाजपचे दोन्ही कार्यकर्ते जखमी झाले.

दरम्यान जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना जमखेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या हल्ल्यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कशामुळे केला याची चौकशी पोलीस करत आहेत. मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला या घटनेमुळे गालबोट लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post