निंबळला दिवाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


माय नगर वेब टीम
अहमदनगर - दिवाळीच्या सुट्टीत शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक (ता. नगर) येथे सालाबादप्रमाणे माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने दिवाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेस सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचे हे 39 वे वर्ष असून, शहरासह ग्रामीण भागातील संघांना सहभागी होण्याचे आवाहन माजी सरपंच विलास लामखडे यांनी केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत होणार्‍या स्पर्धेत मर्यादीत शहरी व ग्रामीण भागातील संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. विजयी संघास 21 हजार रु., उपविजयी संघास 11 हजार रु., तृतीय विजयी संघास 7 हजार पाचशे रु. व चतुर्थ विजयी संघास 5 हजार रुपयाचे रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक यांना रोख बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे. निंबळक येथील ग्रीन हील स्टेडियममध्ये सिझन बॉलवर ही स्पर्धा रंगणार असून, उत्कृष्ट संघांचे शानदार प्रदर्शन क्रिकेट रसिकांना पहावयास मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक कळसे, सागर चिंधाडे, निलेश दिवटे, अतुल मगर, केतन लामखडे, अजय लामखडे, सागर कळसे, कृष्णा गुंजाळ, समीर पटेल, एकनाथ सकट महेश शेळके, अमोल कोळेकर, सचिन कोतकर, सुनिल जाजगे, बाळू कोतकर आदींसह दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टचे सदस्य व गावातील युवक परिश्रम घेत आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नांव नोंदणीसाठी अशोक कळसे मो.नं.9588693277 व अतुल मगर मो.नं.8999494550 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post