शांतीकुमारजी फिरोदिया फाऊंडेशनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनने पालकत्व स्विकारलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू भाग्यश्री फंड व सोनाली मंडलिक तर सांगली जिल्ह्यातील संजना बगाडी यांनी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तर यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन आपल्या जिल्ह्यासह फाऊंडेशनचे नांव उंचावले आहे. या महिला कुस्तीपटूंना फाऊंडेशनच्या वतीने उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या.
नुकतेच आळंदी (जि. पुणे) येथे झालेल्या 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने 61 किलो वजनगटात, सोनाली मंडलिकने 57 किलो वजनगटात तर संजना बगाडी हीने 73 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. नरेंद्र फिरोदिया यांनी महिला कुस्तीपटूंनी आपल्या जिल्ह्याचे नांव उंचावले असून, नगर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू निश्चित ऑलंम्पिकमध्ये भविष्यात देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर महिला सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्वसिध्द करीत असून, जिल्ह्याला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे. या कुस्तीपटूंच्या कामगिरीने त्याला झळाळी मिळाली असून, अशा गुणी खेळाडूंना शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे. गुणी खेळाडूंच्या मागे आपण सदैव उभे असल्याची भावना व्यक्त करुन, खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment