मोदी आज जळगावात




माय नगर वेब टीम
जळगाव/मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावातून करणार असून उद्या (दि.13) रोजी उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या सर्व उमेदवारांसाठी विमानतळासमोरील भारत फोर्ब्सच्या मैदानावर दुपारी 12 वाजता ही जाहीरसभा होणार आहे. या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौर्‍यानिमित्त प्रशासनास्तरावर कायदा, सुव्यवस्थेसंदर्भात विशेष लक्ष देण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विविध ठिकाणी सीसीटीव्हीची करडी नजर राहील. या सभेसाठी जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहील. दरम्यान, जळगावातील सभेनंतर पंतप्रधान मोदी दुपारी 3 वाजता साकोली (जि.भंडारा) येथील सभेसाठी रवाना होतील.

राज्यात नरेंद्र मोदींच्या नऊ सभा
विधानसभा निवडणुकी-साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे. याच दिवशी पंतप्रधानांची साकोली (जिल्हा भंडारा) येथेही सभा होणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला, पनवेल आणि परतूर येथे तर 17 ऑक्टोबरला पुणे, सातारा, परळी येथे सभा होणार आहेत. 18 ऑक्टोबरला मुंबई येथील सभेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारदौर्‍याची सांगता होणार आहे, असे इराणी यांनी सांगितले.

दरम्यान, जळगावच्या सभेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून पोलीस प्रशासनादेखील बंदोबस्तात कुठलीही कमतरता राहू नये म्हणून कंबर कसली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post