टीम इंडियाचे घरच्या मैदानावर चार वर्षांत ७४% विजय नाेंद; भारत- आफ्रिका उद्यापासून सामना
माय नगर वेब टीम
विशाखापट्टणम -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसाेटी मालिकेला आता उद्या बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. मालिकेतील सलामीचा कसाेटी सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगणार आहे. आता मालिका विजयाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याच्या इराद्याने यजमान भारतीय संघ घरच्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे सलामीच्या कसाेटी सामन्यावर सर्वांची नजर असेल. नुकतीच या दाेन्ही संघांत झालेली टी-२० सामन्यांची मालिका बराेबरीत राहिली. भारत आणि आफ्रिकेने प्रत्येकी एका विजयासह तीन सामन्यांच्या या मालिकेत बराेबरी साधली. आफ्रिकेने तिसरा सामना जिंकून भारताला बराेबरीत राेखले. आता आफ्रिकेची नजर सलामीच्या कसाेटीत भारतावर मात करण्याकडे लागली आहे. मात्र, यासाठी आफ्रिकेच्या टीमला माेठी कसरत करावी लागेल. गत भारतीय संघाची आपल्या घरच्या मैदानावरील कामगिरी काैतुकास्पद ठरली आहे. भारताने गत चार वर्षांत ७४ टक्के सामने जिंकले.
आफ्रिकेचा आशियात शेवटचा विजय २०१४ मध्ये नाेंद
आशियातील मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत सपशेल अपयशी ठरला असल्याचे चित्र आहे. टीमने आतापर्यंत आशियातील चार संघांविरुद्ध सामने खेळले, मात्र यात टीमला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेने यामध्ये भारतविरुद्ध सर्वाधिक १६ कसाेटी सामने खेळले. यातील आठ कसाेटीत भारताने यजमान आफ्रिकेचा पराभव केला. यातील पाच कसाेटीत आफ्रिकने विजय नाेंदवला.
Post a Comment