काँग्रेसची दुसरी यादी, ५२ उमेदवारांची उमेदवारी जाहीर





माय नगर वेब टीम

मुंबई -  विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी काल रात्री जाहीर करण्यात आली. या यादीत ५२ उमेदवारांची नावं आहेत. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना, तर चिखलीमधून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर दक्षिणमधून विद्यमान आमदार भिसेंचा पत्ता कट करून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह ५१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत ५२ उमेदवारांचा समावेश आहे. तर तिसरी आणि अंतिम यादी उद्या रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता मैदानात असतील.

गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांना तर दहिसरमधून अरुण सावंत, मुलुंडमधून गोविंद सिंग, माहिममधून प्रवीण नाईक, जोगेश्वरीतून सुनील कुमरे, डोंबिवलीतून राधिका गुप्ते, कल्याण पश्चिम कांचन कुलकर्णी आणि भिवंडीतून शोएब गुड्डू यांना उमेदवारी दिली आहे.

कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार
कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
राजेश एकाडे – मलकापूर
राहुल बोंद्रे – चिखली
स्वाती वाकेकर – जळगाव (जामोड)
संजय  बोडके – अकोट
विवेक पारस्कर – अकोला पूर्व
रजनी राठोड – वाशिम
अनिरुद्ध  देशमुख – अचलपूर
शेखर शेंडे – वर्धा
राजू परवे – उमरेड
गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
सहसराम कारोटे – आमगाव
आनंदराव गेडाम – आरमुरी
डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
सुभाष धोटे – राजुरा
विश्वास झाडे – बल्लारपूर
वामनराव कासावार – वणी
वसंत पुर्के – राळेगाव
शिवाजीराव मोघे – आर्णी
विजय खडसे – उंबरखेड
भाऊराव पाटील – हिंगोली
सुरेशकुमार जेठालिया – परतूर
किसनराव गोरंटियाल – जालना
डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
हिरामण खोसकर – इगतपुरी
शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
राधिका गुप्ते – डोंबिवली
कुमार खिलारे – बोरिवली
अरविंद सावंत – दहिसर
गोविंद सिंग – मुलुंड
सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
युवराज मोहिते – गोरेगाव
जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
जयंती सिरोया – विलेपार्ले
प्रविण नाईक – माहिम
उदय फणसेकर – शिवडी
हिरा देवासी – मलबारहिल
डॉ. मनिष पाटील – उरण
नंदा म्हात्रे – पेण
दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
अरविंद शिंदे – कसबा पेठ
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
दिलीप भालेराव – उमरगाव
पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
अविनाश लाड – राजापूर
राहुल खंजिरे – इचलकरंजी
पृथ्वीराज पाटील – सांगली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post