विखेंच्या उमेदवारी अर्जाला आव्हान ?
माय नगर वेब टीम
शिर्डी - ' शिर्डी मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवीत असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळली . मात्र , या निर्णयाला सोमवारी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात तातडीने याचिका दाखल करून आव्हान दिले जाईल. ' असे काँग्रेस उमेदवार सुरेश थोरात यांनी जाहीर केले.
विखे पाटलांनी अर्ज दाखल करताना नमुना नंबर. २६ नुसार जे शपथपत्र दाखल केले आहे, ते कायदेशीर नाही. नोटरी कायद्यानुसार ते नसून एक साधे दस्त आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत, अशी हरकत घेत विखे यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी मागणी सुरेश थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांचेकडे केली होती. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले. मात्र , या हरकती फेटाळून विखे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. यानंतर थोरात यांनी या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात सोमवारी आव्हान दिले जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Post a Comment