अटीतटीच्या लढतीत श्रीगोंद्यात पाचपुतेंचा विजय





माय नगर वेब टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा विधानसभेच्या निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे उमेदावर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी अखेर बाजी मारली. 4740 मतांनी भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांचा विजय झाला. असला तरी राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांनी घेतलेली मते निर्णायक राहिली. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर शेलार यांनी कमी वेळेत केलेली तयारीत देखील राष्ट्रवादीने दिलेली लढत चुरशीची ठरली.

श्रीगोंदा मतदारसंघात लढतीत भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्यात अटीतटीची लढत झाली. साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला चिचोंडी पाटील परिसरातील मतांमध्ये सातव्या फेरी पर्यंत पाचपुतेंना तीन हजाराच्या आसपास आघाडी होती. मात्र बेलवण्डी, मांडवगण, कोळगाव या भागातील मतमोजणी सुरु झाल्यावर आठव्या फेरीपासून शेलार यांनी पाचपुते यांची आघाडी कमी करत शेलार चौदाव्या फेरीत शेलार याना 920 मतांची आघाडी मिळाली. ही आघाडी कायम राहत सतराव्या फेरीत 3357 मतांची आघाडी मिळाली. यानंतर राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार मतमोजणी केंद्रावर आले. मात्र विसाव्या फेरी पासून अवघ्या 31 मतांनी पाचपुते आघाडीवर आले. . एकवीस ते पंचवीस फेरीपर्यंत अटीतटीची लढत होऊन काष्टी गटातून मिळालेली पाचपुतेंना मतांची साथ भाजपच्या विजयाकडे घेऊन गेली. काष्टी गट पाचपुतेंचा बालेकिल्ला असल्याने या गटाने पाचपुतेंची बेरीज वाढवली. इथे शेलारांनी मते घेतली मात्र त्यांची बेरीज वाढवली नसल्याने पाचपुतेंचा विजय इथे सुकर झाला. 25 व्या फेरी अखेर 4740 मतांनी पाचपुते विजयी झाले.

टपाल मतदानामध्ये देखील पाचपुतेंना 227 मतांची आघाडी होती. शेलार यांना 528 तर पाचपुते याना 755 मते मिळाली. श्रीगोंदा मतदार संघात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमाराला मतमोजणी सुरू झाली. मात्र म्हणाव्या अशा गतीने मतमोजणी होत नसल्याने कार्यकर्ते सोशल मीडियावर मात्र लीड वर नसलेले उमेदवार हजारों मतांनी आघाडीवर असल्याचे पसरावरत होते. मतमोजणी संपली तबबल अकरा तासाच्या प्रतीक्षेनंतर सायंकाळी सहा वाजता.

श्रीगोंदा मतदारसंघातील मतमोजणी साठी 25 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते. 14 टेबल वर ही सुरु झालेली मतमोजणीसाठी तबबल अकरा तास लागले. याच वेळी अधिकृत निकाल घोषित होण्याऐवजी सोशल मीडियात मात्र भलतेच मॅसेज फिरत राहिले.
कोणाला किती लीड याची प्रतीक्षा सगळ्यांनाच असल्याने आणि संथ गतीने सुरू असलेली मतमोजणी मध्ये अठराव्या फेरी वेळी जेवणाचा कालावधी नंतर साडेतीन वाजता सुरू झाली. मतमोजणी संपली सहा वाजण्याच्या दरम्यान. यातच अतिशय घासून सुरू असलेली निवडणूक यात कोण पुढे कोण मागे हा निकाल ऐकण्यासाठी लागलेली उत्सुकता. यात अनेक कार्यकर्ते पावसात भिजले. मात्र शेवटी पाचपुतेची विजयी सरशी झाली मात्र निकाल ऐकायला आले अनेक जण पावसात भिजले तसे बराच काळ प्रतीक्षेत राहिले.

शेलारांनी वाढवली निवडणुकीत चुरस
निवडणूक जाहीर झाल्यावर पाचपुते साठी एकतर्फी वाटत होती. अनेक निवडणूक जाणकार हे पाचपुते हे चाळीस ते पंचेचाळीस हजरांच्या मताधिक्याने निवडून येतील; परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतल्यानंतर बदलेले मतदारसंघातील वातावरण पाहता राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी अटीतटीची लढत देत निवडणुकीत चुरस वाढवल्याचे निकालावरून लक्षात आले. 

मिळालेली मते 
भाजप उमेदवार बबनराव पाचपुते याना 102503 मते पडून विजयी झाले. राष्ट्रवादी उमेदवार घनशाम शेलार याना 97980 मते पडली. बसपा उमेदवार सुनील ओहोळ याना 1146मते, शेकाप चे उमेदवार बाळू जठार याना 378 मते, संभाजी बिग्रेडचे टिळक भोस याना 1186 मते, वंचित आघाडी मच्छिंद्र सुपेकर याना 3164 मते, बहुजन मुक्ती मोर्चा चे तात्याराम घोडके याना 288 मते, अपक्ष प्रमोद काळे 289 मते, अपक्ष राजेंद्र नागवडे 325 मते, सुनील उदमले 267 मते, अपक्ष हरिचंद्र पाचपुते 891 मते, नोटा ला 1572 मते पडली. अशी एकूण 209989 मते पडली.

माणसे वाढली,
मते मात्र कमीच
राजकीय चर्चा करताना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सोयीसाठी विखेंच्या मध्यस्तीने राजेंद्र नागवडे यांचा भाजप प्रवेश झाला .त्यांच्या बरोबर पालिकेचे नगराध्यक्ष पती तसेच पाच नगरसेवक भाजपमध्ये आले .2014ला साथ सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा पचपुतेच्या बरोबर आले होते. परंपरागत राजकीय विरोधक असलेले पाचपुते आणि नागवडे यांच्या किती कार्यकर्त्यांना हा नागवडेंचा भाजप प्रवेश रुचला हा देखील अभ्यासाचा विषय असल्याने शेलारांच्या मतांची बेरीज वाढली असल्याची चर्चा होती

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post