अयोध्येत १० डिसेंबरपर्यंत जमावबंदी, १८ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता





माय नगर वेब टीम
नवी दिल्ली  - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी १८ नोव्हेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अयोध्येमध्ये रविवारी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार १० डिसेंबरपर्य़ंत अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अयोध्येतील २०० शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्याप्रकरणी सुनावणीचा आजचा ३८ वा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा आणि अतिसंवेदनशील खटला असून याचा निकाल १७ नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे.

या खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.  स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा आणि अतिसंवेदनशील खटला असून याचा निकाल १७ नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. कारण, या खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.  जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरपर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू राहणार आहे. आगामी दिवाळी आणि गोवर्धन या सणांच्या काळातही हे कलम लागू राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post