भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत, अर्थशास्त्राचे नोबेल विजेते अभिजित बॅनर्जींची टीका
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत आहे अशी टीका अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केली आहे. मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सध्या जी काही आकडेवारी समोर येते आहे ती भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने मुळीच चांगली नाही असंही मत अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत डळमळीत झाली आहे असं मत अभिजित बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. आजच अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. जागतिक स्तरावरचं दारिद्र्य कमी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत जेव्हा त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. एवढंच नाही तर सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था डळमळीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
Post a Comment