सत्तेचा उन्माद जनता खपवून घेणार नाही; शरद पवार यांचा भाजपवर घणाघात
माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यातील निवडूकीचे निकाल पाहिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, त्यावर भाष्य केले आहे. यात त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवार यांनी उपहासात्मक टीका केली आहे. शिवसेनेसोबत संभाव्य युतीची शक्यता यावेळी पवारांनी फेटाळून लावली.
शरद पवार म्हणाले, आमचा मित्रपक्ष कॉंग्रेस आहे आणि काँग्रेससोबत आम्ही काम करणार. निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे काम करत आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या निवडणुकीत असे दिसतेय की, लोकांना सत्तेचा उन्माद लोकांना पसंत पडलेला नाही. सत्ता येते-जाते पण, जमिनीवर पाय ठेवून काम केले नाही तर, लोक स्वीकारत नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. या निवडणुकीत पक्षांतराच्या निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिलेला नाही.
काही अपवाद वगळले तर, ज्यांनी पक्ष सोडला त्यांना लोकांनी स्वीकारले नाही. प्रथमदर्शनी ज्यांनी पक्षांतर केले त्यांच्या विरोधात वातावरण दिसत आहे. या निकालानंतर आम्ही आता मित्र पक्षांनसोबत बैठक घेऊन, कामाचा आढावा घेऊ. निवडणूकीचा निकाल पाहता . अधिक जोमाने कामाला लागणे महत्त्वाच आहे. नव्या नेतृत्वाला पुढे घेऊन आम्ही काम करणार आहोत. पक्षाला नवी उभारी देणार आहोत. असे या वेळी पवारांनी स्पष्ट केले.

Post a Comment