नवी दिल्ली - महाराष्ट्रासह हरियाणात जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसून या निकालावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राज्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही आजवर जशी या दोन्ही राज्यांच्या आम्ही केली तशीच सेवा यापुढेही करणार आहोत, असा विश्वास व्यक्त करत दोन्ही राज्यांत भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले. या दरम्यान, हरयाणात सत्तास्थापनेसाठी भाजपला दोन्ही राज्यात कसरत करावी लागणार असून शहा यांनी तातडीने मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे.
अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र व हरयाणातील निकालांवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप-शिवसेना युतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेचे मी कोटी कोटी आभार मानत आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असून महाराष्ट्राची प्रगती आणि तेथील जनतेच्या सेवेसाठी आमचे सरकार सदैव कटिबद्ध राहणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही शहा यांनी अभिनंदन केले

Post a Comment