भालाफेकपटू अनु राणी आठव्यास्थानी



माय नगर वेब टीम

दोहा (कतार) - विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला भालाफेकपटू अनु राणीने आठवे स्थान राखले आहे. या स्पर्धेत ऑॅस्ट्रेलियाच्या केस्ले-ली बार्बरने सुवर्णपदक पटकावले. तर, चीनच्या शीयिंग लियूने रौप्यपदकाची कमाई केली आहे. अनुने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीच्या सामन्यात अनुने दमदार सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात तिने 59.25 मीटर लांब भाला फेकत 12 खेळाडूंमध्ये पाचवे स्थान गाठले होते.

दुसर्‍या प्रयत्नात तिने 61.12 मीटर लांब भाला फेकला. मात्र, तिचे स्थान घसरले. तिसर्‍या प्रयत्नात 60.20 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 60.40 मीटर लांब भाला फेकत तिने आठवे स्थान गाठले. 2014 सालच्या अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणार्‍या अनुने अंतिम सामन्यापूर्वी, आपल्या स्वत:चा 62.34 मीटर लांब भाला फेकण्याचा विक्रम मागे टाकत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. याचवर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अशियायी स्पर्धेत अनुने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, त्याला विश्व अ?ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post