'भाजप शिवसेनेशिवाय राज्य करू शकत नाही'


माय नगर वेब टीम

मुंबई: 'विधानसभेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून जातील,' असा विश्वास व्यक्त करतानाच, 'शिवसेनेशिवाय भाजप महाराष्ट्रात राज्य करू शकत नाही,' असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला.

राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीच लढतो. शिवसेना या निवडणुकीत १०० च्या वर जागा जिंकेल,' असं राऊत म्हणाले. भाजपला बहुमत मिळाल्यास काय असं विचारलं असता, युतीला बहुमत मिळेल असं सावध उत्तर राऊत यांनी दिलं. भाजपला चांगल्या जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असणं साहजिक आहे. शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post