भुलथापांना बळी पडू नका- अनिल राठोड
माय नगर वेब टीम
अहमदनगर - मुलभूत सुविधा पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट यावर नागरिकांचे हक्क आहे. त्यामुळे यास आपले कायम प्राधान्य राहिले आहे. यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रयत्न करतीलच परंतु शहराच्या विकासात भर घालणारे विविध मोठे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्ता असणे आवश्यक आहे. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे पुढील काळात नगरच्या विकासासाठी जास्तीत निधी आणणारा व विकासाची दृष्टी असणारा नेता विधानसभेत जाणे गरजेचे आहे. तेव्हाच नगरचा खर्या अर्थाने विकास होईल. तेव्हा आता कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नका धनुष्यबाणाला मतदान करुन मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा. असे आवाहन अनिल राठोड यांनी यावेळी केली.
महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.८ व १५ मध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, अनिल शिंदे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, विजय पठारे, अर्जुन दातरंगे, संजय सागावकर, हर्षवर्धन कोतकर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार फेरीत प्रभागातील आठही नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ही प्रचारफेरी कल्याण रोड, विद्या कॉलनी, आदर्शनगर, श्रीकृष्णनगर, शिवाजीनगर आदि भागातून काढण्यात आली.
राठोड म्हणाले शहराच्या सर्वात जवळचा भाग आहे. साहती वाढत आहे, लोकवस्ती विस्तारात आहे,. परंतु त्या प्रमाणात सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. या भागाचा सर्वांगिण विकास करण्याचे आश्वासन आपण मनपा निवडणुकीत दिली होते. त्यामुळेच आपणा सर्वांच्या आशिर्वादाने या भागातून शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतदान करुन प्रभाग ८ व १५ मधील सर्वच्या सर्व आठही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या आचारसंहितेमुळे विकास कामे होऊ शकली नाहीत परंतु पुढील काळात या भागात मोठी विकास कामे होणार आहेत.या भागाच्या विकासासाठी हे सर्व नगरसेवक कटीबद्ध राहणार आहेत. ज्याप्रमाणे मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या मागे आपण ठामपणे उभे राहिलात आताही महायुतीचे मागे उभे रहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांनी केले.

Post a Comment